पुणे : विकसित भारताची संकल्पना प्रभावीपणे मांडणारे, नव्या पिढीचा आवाज उठवणारे नवे कोरे गाणे ज्याचं नाव ‘विकसित भारतम’_”नये भारत का नया गीत हम…” या गीताचे नुकतेच आर्यनस् वर्ल्ड स्कूल, पुणे येथे राष्ट्रार्पण पार पडले. या गीताची संकल्पना, रचना आणि निर्मिती यशवंत इन्स्टिट्यूट आणि टाकळकर क्लासेसचे संचालक शीतल पाटील यांनी केली आहे. याचे गायन आणि संगीत दिग्दर्शन भूषण विश्वनाथ या नवोदित आणि प्रतिभावंत कलाकाराने केले आहे.
यशवंत इन्स्टिट्यूट आणि टाकळकर क्लासेसच्या माध्यमातून श्री . शीतल पाटील नेहमीच पालकांसाठी आणि विद्यार्थ्यासाठी नवनवीन शैक्षणिक, सामाजिक तसेच राष्ट्रभक्तीपर प्रेरणादायी उपक्रम राबवत असतात. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, “येत्या काही दिवसात देशासह जगभरातील देशाभिमानी, सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आणि संगीत प्रेमी लोकांसाठी विकसित भारतम हे गाणे एका सुंदर व्हिडिओ सहित प्रदर्शित केले जाणार आहे.”
आर्यनस् वर्ल्ड स्कूल, पुणे येथे या गाण्याच्या ध्वनीफीतीचे विमोचन (ऑडियो रिलीज) भारतीय जनता पक्षाचे खडकवासल्याचे कर्तव्यतत्पर आमदार भीमराव अण्णा तापकीर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले आणि कला क्षेत्रातील अखिल भारतीय संघटन असलेल्या संस्कार भारती या संस्थेचे प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी आणि आर्यानस वर्ल्ड स्कूल पुणे चे संस्थापक मिलिंद लडगे यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आमदार भीमराव अण्णा तापकीर म्हणाले, “हे गीत नव्या पिढीचे, बदललेल्या भारताचे स्फुती गीत आहे. या गीतामधून आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत देशातील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोचेल असा विश्वास व्यक्त केला. नव्या पिढीने हे गाणे फक्त ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता यात व्यक्त केलेला संदेश स्वतः आचरणात आणून पुढे वाटचाल केली पहिजे” असेही आग्रही प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.
मेघराज राजेभोसले यांनी आपण “अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून हे गीत समस्त मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू” असे आश्वासन दिले.
हे फक्त एक गाणे नसून वेगाने प्रगती करत असलेल्या देशाच्या आत्मविश्वासाचे आणि विश्र्वगुरू संकल्पाचे प्रतिक आहे. या गाण्यातून देशप्रेम आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान रुजवण्याचे काम टाकळकर क्लासेस करत आहे ‘ असे सांगून सर्वांनी हे गाणे ऐकून देशवासीयांना, विशेषतः विद्यार्थ्यांना ऐकण्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन सतीश कुलकर्णी यांनी केले.
टाकळकर क्लासेसचे संस्थापक प्रा.केदार टाकळकर तसेच संचालक प्रा. रितेश भट्टड यांचे विकसित भारतम उपक्रमास मोलाचे सहकार्य लाभले. या राष्ट्रार्पण सोहळ्यास भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई, पुणे संस्कार भारतीच्या सचिव धनश्री देवी,आर्यनस वर्ल्ड स्कूलचे अध्यक्ष मिलिंद लडगे, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.