Spread the love
पुणे – वर्तमान आणि भविष्य या दोन्हींवर कल्पकतेचा प्रभाव असणार आहे आणि असणार आहे. त्यामुळे कल्पक व्यक्तींच्या प्रगतीचा वेग हा इतर व्यक्तींच्या तुलनेत अधिक असतो आणि असणार आहे, असे प्रतिपादन समाज माध्यमांचे अभ्यासक व्यंकटेश कल्याणकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा) माहिती तंत्रज्ञान विभागाने आयोजित केलेल्या ‘ई-गर्व्हनन्स’ या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ‘सोशल मीडिया आरि प्रशासन’ या विषयावर कल्याणकर बोलत होते.  
ते पुढे म्हणाले, ‘‘कोणत्याही भेदाभेदाशिवाय नव्या तंत्रज्ञानातील सगळी साधने (टूल्स) सर्वांना सहजपणे उपलब्ध झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत टूल्स आणि त्यांचा सुयोग्य वापर शिकणं सहज सोपं आहे. मात्र कोणत्या टूलचा कोणत्यावेळी कशासाठी वापर करायचा हे वापरणाऱ्याच्या कल्पकतेवर अवलंबून आहे.’’ 
समाजमाध्यमांचे अर्थकारण समजावताना ते म्हणाले, ‘‘आपल्या दैनंदिन जीवनावर सोशल मीडियाने प्रचंड प्रभाव पाडला आहे. ही माध्यमं आपला प्रचंड वेळ घेत आहेत. बहुतेकांना यातून प्रचंड वेळ वाया जात असल्याचे वाटते. मात्र, या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे समाजमाध्यमे वेळखाऊ माध्यमे न समजता ‘सोशल मीडिया मार्केटिंग’टूलचा वापर केल्यास आपण आपल्याला हवी ती व्यावसायिक, प्रशासकीय किंवा इतर उददिष्टे पूर्ण करू शकतो. याबाबतची जागृती करणे आवश्यक आहे.’’
 प्रशासनाच्या अशाच अधिक कार्यशाळेसाठी संपर्क 77987 03952 या क्रमांकावर साधावा.यावेळी राज्य शासनाच्या विविध विभागांमधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी खालील मुद्दे मांडले –
• नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या नव्या माध्यमांमध्ये परिणामाची कोणतीही परिमाणे तयार झालेली नाहीत. त्यामुळे प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्ट करताना प्रयोग म्हणून करावा लागते. त्यातील निष्कर्ष आणि अनुभवांवर पुढील प्रयोग करता येतात.
• समाज माध्यमांसाठी प्रशासनाच्या चौकटीत राहून आशय निर्मिती करणे हे एक आव्हान असले तरीही नागरिककेंद्रित आशय निर्मिती शक्य आहे.
• आशय निर्मिती करताना नागरिकांच्या जीवनावर थेट प्रभाव पाडणाऱ्या बाबी प्राधान्याने विचारात घेणे आवश्यक.
• प्रशासकीय किंवा वैयक्तिक पद्धतीने सोशल मीडियावर माहिती शेअर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या शब्दांवरून आपले व्यक्तीमत्व ओळखले जाते.
• समाजमाध्यमांनी आपल्याला प्रतिमा निर्मितीची संधी दिली आहे. आपण त्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे.