Spread the love

पुणे : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से) यांनी शनिवारी पुणे स्मार्ट सिटीच्या कार्यालयास भेट देऊन स्मार्ट सिटी मार्फत राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली.

पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते (भा.प्र.से) आणि पुणे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी विविध आयटी तसेच सिविल प्रकल्पांचे सादरीकरण केले. यात प्रामुख्याने अॅडॅप्टीव्ह ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस), इंटिग्रेटेड कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी), स्मार्ट स्ट्रीट, स्मार्ट स्कूल, प्लेसमेकिंग प्रकल्पांसह, ई-बस, स्मार्ट हेल्थ क्लिनिक प्रकल्प तसेच पायाभूत सुविधा याबद्दल माहिती दिली.

यावेळी सौ.उल्का कळसकर मुख्य वित्त अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी तथा सह आयुक्त लेखा व वित्त अधिकारी, पुणे महानगरपालिका, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी दिनेश वीरकर, कंपनी सचिव स्वानंद शेडे, मुख्य अभियंता सुधीर चव्हाण, उप-अभियंता सुरेश बोरसे व इतर कर्मचारी उपस्थित होते.