Spread the love

मुंबई : महारेराच्या वसुली आदेशाच्या अंमलबजावणीला अखेर वेग आला आहे. आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईचे १२५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मुंबईतून सर्वाधिक ९२ कोटी रुपये वसुली झाली आहे.मुंबई शहरातील आठ प्रकल्पांतील १४ वसुली आदेशांपोटी २१.१९ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

तर मुंबई उपनगरांतील ४० प्रकल्पांतील ७५ आदेशांपोटी ७१.०६ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरम्यान, या आदेशांच्या अंमलबजावणीनुसार रक्कम अदा न करणाऱ्या विकासकांविरोधात कडक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय महारेराने घेतला असून संबंधित विकासकाच्या बँक खात्यावर टाच आणण्यात येणार आहे.

महारेराने नुकसानभरपाईसाठी आतापर्यंत ४२१ प्रकल्पांतील ६६१.१५ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी १०९५ आदेश जारी केले आहेत. यापैकी आतापर्यंत ११७ प्रकल्पांतील २३७ आदेशांपोटी एकूण १५९.१ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.