चहापेक्षा किटल्या गरम हे वाक्य नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात वापरले होते. आणि ते एकदम योग्यच आहे. चहा पेक्षा किटल्या गरम हे नक्कीच भाजपमध्ये जाणवते. अनेक वेळा चर्चेत राहिलेले हे ओएसडी पीए हे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.
कित्येक वेळा फोन न उचलणारे उपमुख्यमंत्र्याचे देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी दिल्लीतील मनोज मुंडे असतील विधानसभेसाठी इच्छुक असणारे सुमित वानखेडे असतील, मी परत फोन करते म्हणणारे निधी कामदार असतील, अचानकपणे अहंकार वाढलेले चंद्रकांत दादा पाटील यांचे पुण्यातील पीए मंगेश देशपांडे, राहुल देशपांडे असतील ही माणसे फक्त उदाहरणे आहेत . केंद्रामध्ये अनेक हिंदी भाषिक असतील हे चहापेक्षा किटल्या गरम असाच प्रकारे यांच्यामध्ये आहे.
कित्येक मंत्री संत्र्यांपेक्षा यांच्याच हान्याहंजा प्रत्येक वेळेस सामान्य व्यक्ती करत असतो. यांचे सोशल मीडियाचे स्टेटस म्हणजे की ,माय बापाने मला शिकवला आहे की ,पाय जमिनीवर ठेवून काम करावे कोणा विषयीही अहंकार ठेवू नये परंतु सामान्य व्यक्तीला प्रतिनिधी पर्यंत पोहोचू न देणे मनात पूर्वग्रह ठेवणे , अशा कितीतरी गोष्टींना सामान्य व्यक्ती सामोरे जात असतो.
महाराष्ट्रातील अन्य मंत्र्यांनी पैकी त्यांचे असणारे खाजगी पीए किंवा सरकारी पीए यांना जनतेच्या प्रतिनिधींना भेटून देण्यासंदर्भात प्रत्येक वेळेस दया याचनाच करावी लागते. वेळेवर फोन न घेणे, फोनला रिप्लाय न देणे अशा अनेक गोष्टी किटलीतील गुरमी वाल्यांना कडे असतात.
जनसंपर्काच्या माध्यमातून अनेक वेळा या लोकांची संपर्क येत असतो परंतु अनेक पीए आणि स्वीय सहाय्यक यांच्यामध्ये गुरमी आणि मोठेपणा यांच्यामध्ये ठासून ठासून भरलेला असतो. अनेक पत्रकार देखील खाजगीत याविषयी बोलतात.
किटलीतील गुरमी वाल्यांना एवढा अहंकार आणि एवढा माज येतोचं कसा ? महाराष्ट्राची कित्येक वेळा सामान्य जनता प्रतिनिधीपर्यंत त्याचे प्रश्न पोहोचू शकत नाही, असा सवाल जनता नेहमीच विचारत राहते.
– प्रशासन टाइम्स