Spread the love

पुणे: दिघी येथील  दिघी पो ठाणे गु र क्र १९५/२३ हा गुन्हा मंगळसूत्र चोरी प्रकरणी दाखल करण्यात आला होता, संशयित आरोपी बजरंग चतुर मारवाडी कुंभार यावर आधीचे गुन्हे असल्याकारणाने अटक करण्यात आली होती आणि जे एम एफ सी, खडकी न्यायालय यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला होता, परंतु मोका कार्यवाही नंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.

त्याचे मोक्याचे जामिन मिळण्यकामी वकील सुशांत तायडे यांनी युक्तिवाद करत मुद्दे उपस्थित केले की तो सराईत चोरीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी असला तरी मोक्याचे कडक शासनामध्ये त्याला जास्त दिवस आत ठेवता येणार नाही. जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.

 

वकील सुशांत तायडे यांना प्रज्ञा कांबळे, दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकुळे यांनी सहकार्य केले.

भा. द. वी. ह्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळून देखील मोका लावल्यावर पुन्हा अटक होणे ही साधारण बाब होतांना दिसत आहे. एका आरोपीला पुन्हा त्याच गुन्हा मध्ये दुसऱ्यांदा अटक करता येत नाही या मूलभूत बाबी कडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मोका कार्यवाही चौकशी ही आरोपी बाहेर राहून देखिल पूर्ण करता येऊ शकते.

       – वकील सुशांत तायडे