पुणे – पुण्याची ओळख आता नव्या स्वरूपात होणार आहे. ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रम चळवळीचा शुभारंभ 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये होणार आहे.
यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करा त्यांचा फोटो आणि व्हिडिओ काढा सोबतचा किंवा कोड स्कॅन करा किंवा pbf24.in/register दिलेल्या वर रजिस्टर करा व फोटो पाठवा आणि आपल्या सहभागाबद्दल प्रमाणपत्र मिळवा.
आपली वाचन संस्कृती अधिकाधिक वाढावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 14 ते 22 डिसेंबर पुस्तक महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून जास्तीत जास्त लोकांनी भेट द्या, असे संयोजकांनी आवाहन केले आहे.