पुणे: खडक पोलीस ठाणे गु. र.क्र २७५/२३ यात फिर्यादी सुलतान चांद शेख यावर चार कोयत्याचे वार केल्या प्रकरणी १.राहुल शेंडगे (टोळी प्रमुख) २.करण आगलावे ३.लखन आगलावे ४.महेश आगलावे ५.विशाल पारधे ६.रोहन शेंडगे ७.शंकर कोंगाडी ८.रोहित थोरात यांच्यावर भा.द.वि कलम ३०७ आणि मोक्याची कारवाई करण्यात आली होती.
वरील आरोपी १ ते ६ यांच्यावतीने वकील सुशांत तायडे यांनी त्यांची बाजू मांडत मोका कसा लागू होत नाही आणि दाखल गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध बाबी कशा खोटे आहेत ते मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. सरकार पक्षाने आरोपी १,२,४ आणि ६ यांच्याकडून हत्यार जप्त करण्यात आल्या कारणाने आणि गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे जामीनास विरोध दर्शविला होता.
मेहरबान विशेष मोका न्यायाधीश यांनी खटल्याचे संपूर्ण अवलोकन करून सर्व आरोपी यांना जामीन मंजूर केला.
आरोपी १ते६ यांच्या वतीने कामकाज सुशांत तायडे, प्रज्ञा कांबळे, दिनेश जाधव, जितू जोशी व शुभांगी देवकुळे यांनी पाहिले.
कोट:मोका खटल्यातील प्रकरण हे २ ते ३ वर्ष फक्त जामीन अर्जांच्या सुनावणीसाठी प्रलंबित असतात, कारण सर्व आरोपी यांची एकत्र काम ठेवण्यास त्यांच्या घरच्यांची मनाई आणि त्यामुळे वकिल एकत्र काम ठेवण्यास धाडस करीत नाही. तरी सदर खटल्यांमध्ये वकील आणि न्यायाधीशांनी त्वरित व एकत्रित आरोपींचे कामकाज मांडणे आणि त्वरित व एकत्रित आदेश पारित करणे ही काळाची LS