बारामती: महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा ताई पवार यांच्या प्रचाराचा धडाक्याला जोरदार सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभेच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाची माहिती देत यापुढील विकासाचे नियोजन कशा प्रकारे असणार आहे याची माहिती सर्व गावांमध्ये पोहोचवली जात आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीची उमेदवार म्हणून बारामती तालुक्यातील आजच्या गाव भेट दौऱ्याची सांगता पाहुणेवाडी या गावात झाली आहे. या ठिकाणी गेली 25 वर्षे केलेल्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे सुरू असलेले काम आणि इतर विकास कामांची माहिती देण्यात आली. तसेच विविध प्रश्नांबाबत चर्चा होऊन ग्रामस्थांनी मताधिक्याची ग्वाही दिली. यावेळी पाहुणेवाडी ग्रामस्थांनी स्वागत केले.सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच भगवान तावरे,भाग्यश्री धायगुडे, सुनील पवार, अमरसिंह जगताप, दीपक तावरे, पोपटराव गावडे, अविनाश गोफने, सतीश तावरे, ग्रामस्थ, राष्ट्रवादीसह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.