पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर ठराविक भागात ठराविक काळासाठी निर्बंध लादले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने याचे आदेश काढले असून मद्य विक्री बंद ठेवण्याचे दिवस नक्की केले आहेत. बारामती, मावळ, पुणे आणि शिरूर मतदारसंघांसाठी हे आदेश असून त्याच्या प्रती राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविल्या आहेत.
५ मे, ६ मे, ११ मे, १२ मे, १३ मे, ४ जून रोजी प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि मतमोजणी दिवशी मद्यविक्री बंद राहणार आहे. ज्या भागात आदेशाचे उल्लंघन होईल, तेथील स्थानिक यंत्रणा त्यास जबाबदारी असेल असे आदेशात नमूद केले आहे.