Spread the love

मुंबई :  आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठित लढतींपैकी एक असणाऱ्या माढा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून रंजक आणि वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत.  भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील घराणे प्रचंड नाराज झाले होते. मात्र, या नाराजीची भाजपकडून दखल न घेण्यात आल्याने धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आता कमळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाजप आणि महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात  आहे.

या पार्श्वभूमीवर माढ्याची जागा वाचवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मोहिते-पाटलांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. मोहिते-पाटील यांच्यासोबत उत्तमराव जानकर (Uttam Jankar) हेदेखील तुतारी हाती धरतील असे सांगितले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतले आहे.