Spread the love

पुणे : चक्क कारागृहातून दिली राज्य पूर्वपरीक्षा खुनाच्या आरोपात न्यायालयीन बंदी झालेली आहे. तो कला शाखेचा पदवीधर  एखाद्या शासकीय पदावर काम करण्याची त्याची इच्छा आहे. त्यामुळे आजवर त्याने पोलिस कॉन्स्टेबल (एसआरपीफ), सिक्युरिटी सर्व्हिसेस, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर यांसह विविध परीक्षा दिल्या आहेत.

मात्र, खुनाच्या एका प्रकरणात तो अडकला अन् त्याला अटक झाली. खुनाच्या आरोपाखाली तो पाच महिन्यांपासून येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहे. यातच तो पीएसआय पदासाठीच्या मुलाखतीला तो हुकला. तरीही त्याने जिद्द सोडली नाही. चक्क येरवडा कारागृहातून त्याने राज्य सेवा पूर्वपरीक्षा दिली आहे.

दरम्यान, त्याचा जामीन अर्ज प्रलंबित होता. मात्र, सुनावणीच झाली नाही. त्याची जिद्द बघून जुन्नरच्या न्यायालयाने त्याला परीक्षा देण्याचा आदेश पारित केला अन् त्याने रविवारी (दि. १) वाघोली येथील परीक्षा केंद्रावर जाऊन बंदोबस्तात परीक्षा दिली.

पोलिस अधिक माहितीनुसार, जितेंद्र पांडुरंग घोलप याच्यावर ओतूर पोलिस ठाण्यात एका २० वर्षीय मुलाच्या हत्येचा आरोप आहे. मृत मुलाच्या वडिलांनी ३ ऑगस्ट रोजी मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ओतूर पोलिसांच्या तपासात आरोपी आणि मृत मुलामध्ये दि. १ ऑगस्ट रोजी वारंवार कॉल झाल्याचे सीडीआर,टॉवर लोकेशन आणि कबुली जवाब या गोष्टींच्या आधारे पोलिसांनी आरोपी आणि सहआरोपी यांना पकडले. मृताचा मृतदेह आढळून आल्याने आणि इतर जमिनीच्या वादातून हत्या केल्याचे पोलिसांनी तपासात नमूद केले आहे.

आरोपी जितेंद्र याने पोलिस बंदोबस्तात वाघोली येथील केंद्रावर जाऊन परीक्षा दिल्याची माहिती आरोपीचे वकील सुशांत तायडे यांनी दिली.

या खुनाच्या गुन्ह्यात ऑगस्ट २०२४ पासून तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी आहे. या प्रकरणाबद्दल त्याचा जमीन अर्ज राजगुरुनगर सत्र न्यायालयात प्रलंबित होता; परंतु सुनावणी झाली नाही, म्हणून जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अनंत एच. बाजड यांनी त्याला पोलिस बंदोबस्तात परीक्षा केंद्रमध्ये घेऊन जाण्यासाठी दि.३० नोव्हेंबर रोजी आदेश पारित केला.

आरोपीचे कामकाज सुशांत तायडे यांच्यासह दिनेश जाधव, जीतू जोशी, प्रज्ञा कांबळे, शुभांगी देवकुळे आणि अक्षय घोलप बघत आहेत.