Spread the love
पुणे : मोक्काच्या गुन्ह्यातून सुटूनदेखील गँगच्या इमेजला धोका निर्माण होत आहे, म्हणून ‘त्याला जिवंत सोडणार नाही’ म्हणत फिर्यादीचे अपहरण करून मंगळवार पेठेतून दुचाकीवर निर्मनुष्यस्थळी नेऊन मारहाण केली. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात टोळीप्रमुखासह चौघांना विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी सशर्त जामीन मंजूर केला.
टोळीप्रमुख यश जावळे यासह ओंकार नंदू पवार, गणेश ऊर्फ तामता किसन मुसळे, शिवानंद मारुती कांगुले अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख आरोपी यश जावळे याने वकील सुशांत तायडे यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला. त्यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेनंतर ‘मोक्का’अंतर्गत कार्यवाही करून विशेष मोक्का न्यायाधीश कचरे कोर्टात हजर करण्यात आले होते, सुशांत तायडे यांनी युक्तिवाद केला की त्यांच्यावरील गुन्हा खोटा आहे. संपूर्ण प्रकरण हे बनावट असून, सीसीटीव्ही सोबत छेडछाड करण्यात आली आहे.
न्यायालयीन कामकाज वकील सुशांत तायडे, प्रज्ञा कांबळे, दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकुळे यांनी पाहिले.