परदेशात राहून, भारताच्या लोकशाहीवर डिक्टेटरशीपचा प्रपोगंडा निर्माण करणा-या या माणसाच्या मागचे हात कोणाचे ? हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही.यांची सुरुवात होते, जेव्हा भारत मंडपम् या सभागृहातील एका कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी – ” माझ्या तीस-या टर्म मध्ये, देशाची इकॉनॉमी जगातील तीस-या क्रमांकावर नेणार !” असा विश्वास व्यक्त करतात तेव्हा.
आता भारताची इकॉनॉमी जर जगात तीस-या क्रमांकावर जात असेल, तर त्याचे दु:ख देशातील काही तथाकथित विद्वानांबरोबर देशाबाहेरील पोंगा पंडीतांना ही होणार ! यात शंका नाही. आत ते कोणाचे हस्तक आहेत ? हे ओळखून घेण्या-इतपत भारतीय मतदार हुशार आहे.
असो, आता या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार जर, भारतीय न्यायव्यवस्था दबावाखाली काम करत असेल. तर, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला, चंदीगड महापौर निवडणुक, इलेक्ट्रोल बॉन्ड व कालच्या संजय सिंह यांची बेल यामध्ये दिलेला निकाल कोणत्या दबावाखालील होता हे आधी सांगावे.
आता गंमत अशी आहे. जेव्हा जेव्हा सरकार विरोधी एखादा निकाल कोर्टातून लागतो, तेव्हा- तेव्हा या लोकांचे संविधान शाबूत असते, लोकशाही वाचते.. आणि जेव्हा हेच निकाल सरकार बाजूने लागतात तेव्हा मात्र लोकशाही धोक्यात येते. यावरून या लोकांची लोकशाही बद्दल ची भावना काय ? हे समजून येते.
इलेक्ट्रोल बॉन्ड देशात लागू होण्यापूर्वी देशातील सर्व पक्षांना पैसा मिळयचा, यात कोणालाही शंका नाही. पण तो कसा मिळायचा? कोणाकडून यायचा ? कशा स्वरूपात ? असायचा यांचे कोणतेही स्त्रोत ना इन्कम टॅक्स विभागाकडे होते ना सरकारकडे ! आता मात्र पैसा, कोण, कशा स्वरूपात देतो. याची माहिती सरकारला मिळू लागली तेव्हा या लोकांची धाबी दणाणली व हा घोटाळा -घोटाळा म्हणून प्रपोगंडा सुरू झाला.
आता जसे इलेक्ट्रोल बॉन्ड च्या स्वरूपात पैसे भाजपला मिळाले तसे अन्य पक्षांनाही मिळाले. मात्र भाजपला मिळालेले पैसे भ्रष्ट व तेच इतर पक्षांना मिळालेले पैसे म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद आहेत का ? हा प्रश्न या व्हिडिओ कर्त्या व्यक्तीला का पडू नये !
ज्या वेळेस तुम्ही फ्री अँड फेअर इलेक्शन ची टूम लावता. तेव्हा देशातील पश्चिम बंगाल या राज्यात टिएमसी हा पक्ष मतदारांना कसे मतदानापासून वंचित ठेवतो ? यांचे उदाहरण सांगता का ?
त्रिपुरा मध्ये लेफटिस्ट पार्टीकडून भाजपला मतदान केले, म्हणून सुनेला जाळणारा सासरा दाखवता का ? निवडणूकीच्या आदल्या रात्री पोलिंग बुथ, पोलिंग कर्मचा-यांसकट जाळणारे ? व गावा-गावात मतदानावर बहिष्कार टाका, अन्यथा तुमची मतदान केलेली बोटे छाटली जातील हा संदेश लावणारे लाल नक्षली दाखवता का ? यांचे उत्तर नाही !
कारण, ते व्हिडिओ कर्त्या व्यक्तीच्या फ्री अँड फेअर इलेक्शन व्याख्येत बसत नाही.असो, अमृतकालाचे स्वप्न उराशी बाळगून जगद्गुरु पदावर आरूढ होणा-या भारताला इतर देशांनी लोकशाही व निवडणूक पद्धतीची अक्कल शिकवायची गरज नाही. आणि त्यांच्या शिकवण्याने आम्हाला काही फरकही पडत नाही.
कारण, या अक्कल शिवणा-या देशांत राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभारलेला विरोधी उमेदवार जेल भोगतो, भर सभेत विरोधी पक्ष नेत्याला लोकांसमोर गोळ्या घालून ठार मारले जाते, एका वर्षात ३-३ पंतप्रधान बदलले जातात. ही यांची लोकशाही आहे. अशा लोकशाही चे कौतुक परदेशातील ध्रुव राठी व त्यांचे इथे बसून टाळ्या वाजवणारे डोंबारी करत असतील तर त्यांच्या सारखे कर्म दरीद्री नतद्रष्ट तेच असतील !
भारतात जयचंद राठोडच्या अवलादी अजून जिवंत आहेत. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे इथे बसून ध्रुव राठी चे व्हिडिओ शेअर करणारे व त्याच्या टाळ्यावर माकडा प्रमाणे नाचणारे आमचे पुरोगामी इंडी आघाडीचे लोक यांना जनता येत्या ४ जून ला आपली जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही हे निश्चित..!!!
ये पब्लिक सब जानती है !
-चैतन्य बारसावडे (लेखक ,राजकीय भाष्य करतात .)