पुणे:भारतीय जनता पक्ष सदस्य नोंदणी (संघटन पर्व )अभियान सुरू असून पर्वती विधानसभा क्षेत्रामध्ये नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे माध्यम समन्वयक निखिल पंचभाई यांनी तंत्रज्ञानाविषयी विशेष मार्गदर्शन केले. या नोंदणी कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त पुणे आणि महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन अधिक नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्ताने पर्वती विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धिरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनात ही कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेला भाजपा पुणे शहर सरचिटणीस, भाजपा पुणे सदस्य नोंदणी अभियान संयोजक श्री राघवेंद्रबाप्पु मानकर, पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत दिवेकर सर्व आघाडी व मोर्चाचे पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, बूथ प्रमुख व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पॉवरपॉईंटद्वारे सादरीकरण देत तांत्रिक बाबींची माहिती उपस्थितांना करून दिली.
पुणे शहरातून सर्वाधिक संख्येने सदस्य नोंदणी करण्यासाठी मतदारसंघात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.