राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा संपन्न – गणेश चप्पलवार
पुणे : ‘ग्रामीण – शहरी संस्कृतीचे सांगड घातली, कल्पकतेने पर्यटकांपर्यंत पोहोचले तर निसर्ग, शेती, मोकळ्या हवेची ओढ, पर्यटन केंद्रातील आधुनिक सोयी पर्यटकाला कृषी पर्यटनाकडे खेचून आणतील ‘ असा सूर अँग्रो टुरिझम विश्वच्य आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळेत निघाला.
‘अँग्रो टुरिझम विश्व’ आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.
कृषी पर्यटन कार्यशाळेमध्ये विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या विभागातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.पर्यावरण अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव, अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र प्रमुख राहुल जगताप, सनदी लेखापाल अमोल वायभट, द फार्मचे रितेश पोपळघट’ माध्यम तज्ञ असीम त्रिभुवन आणि अँग्रो टुरिझम विश्व’ चे संस्थापक गणेश चप्पलवार, आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कृषी पर्यटनातील पाहुणचार पर्यटकांची आल्यानंतर घ्यावयाची काळजी, पर्यटकांना विविध उपक्रम आणि अंजनवेलचे केस स्टडीचे सादरीकरण राहुल जगताप यांनी केले. अमोल वायभट यांनी कृषी पर्यटन विषयी आर्थिक, कायदेशीर आणि शासकीय व बँकेचे योजनांविषयी माहिती दिली.
बसवंत विठाबाई बाबाराव यांनी कृषी पर्यटनात पर्यावरणाचे महत्त्व, पर्यावरणपूरक उपक्रम आणि झाडांचे वेगवेगळे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कृषी पर्यटन केंद्रांना काळाची गरज म्हणून असलेली संधी, व्याप्ती, नव माध्यमे, डिजिटल आणि दृक श्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर तसेच समाज माध्यम किती महत्वाचे आहेत, मार्केटिंग व जाहिरात तंत्रांचा वापर केले पाहिजे असे असीम त्रिभुवन यांनी सांगितले.शेतीचे रूपांतर पर्यटनात करताना त्या व्यवसायाची ओळख निर्माण केली पाहिजे.
प्रत्येक कृषी पर्यटन एक ब्रँन्ड म्हणून नावारूपाला कसे आणले पाहिजे. त्यासाठी शेतक-यांनी आपले बलस्थाने ओळखून उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून आपली वेगळी ओळख निर्माण करता येईन असे कार्यशाळेत उपस्थितांना रितेश पोपळघट यांनी आत्मविश्वास निर्माण केले.
कृषी पर्यटन संकलप्ना, सुरूवात, व्याप्ती व विस्तार आणि नोंदणी आणि कृषी पर्यटन एक उद्योग म्हणून व्यावसायिक दृष्टीने कसे पाहिले पाहिजे. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पुढे काय आणि नवीन काय हे तत्व पाळले पाहिजे असे गणेश चप्पलवार यांनी सांगितले. कृषी पर्यटनाची भविष्य, संधी, सध्यस्थिती, कृषी पर्यटनाबरोबरच विविध महोत्सव आणि उपक्रम कसे राबवावे याचे मार्गदर्शन करून कृषी व ग्रामीण पर्यटनातील प्रश्नांचे उत्तर देऊन शंकांचे निरसन केले. दिले.
कृषी पर्यटनाला मध्यभागी ठेवून अनेक व्यवसाय व पर्यटनाचे इतर प्रकार करू शकतो. कृषी पर्यटनाची गरज शेतक-यांना व पर्यटकांना आहे. शहरातील पैसा ग्राणीण भागात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कसा आणू शकतो, कृषी पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी मोठ्यां प्रामाणात कशा उपलब्ध होत आहेत याविषयी मार्गदर्शन मान्यवरांनी केले.