मुंबई: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सावलीप्रमाणे साथ देणारे मनोज मुंडे यांची विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
साल 2014 ते 2019 या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीतील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे ते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.जनतेची कामे करणारे मुख्यमंत्री अशी ओळख मिळाल्यानंतर अधिक जबाबदारी वाढली असून देवेंद्र फडणवीस सामान्य जनतेला न्याय देतील असा विश्वास आहे.
गेले 8 वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यांचे पाठीराखे आणि सावलीप्रमाणे साथ देणारे म्हणून काम केले आहे. मनोज मुंडे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले असून दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून काही काळ दिल्ली पत्रकारिता केली आहे.
त्यांच्या बरोबर सतत राहणारे विशेष कार्यकारी अधिकारी मनोज मुंडे यांची जबाबदारी वाढली असून नक्कीच आपल्या कामाला न्याय देतील असा विश्वास जनतेचा आणि मुख्यमंत्र्यांचा आहे. सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ओळख हे नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे सर्व स्तरातून मनोज मुंडे यांचे अभिनंदन होत आहे.