Spread the love

पराजीत करण्या तुजला..
सरावले सारेच शरदाचे चंद्र
सकला पुरुनी उरला..
तूच एक देवेंद्र…!!

अपमानांचे घोट गिळूनी..
परिश्रमंच तुझे केंद्र..,
उरलांस नमवूनी दिग्गजांना..
तूच एक देवेंद्र..!!

वाघांनी सोडले बाण..
हात-तुतारीचे ही षडयंत्र..,
परतवुनी सारी अस्त्रे.., ठरला
तूच एक देवेंद्र..!!

विकासाची केली होती लाट..
लाडक्या बहिणींची होती साथ..,
सिद्धीले महाराष्ट्रात..
तूच एक देवेंद्र…!!
तूच एक देवेंद्र…!!

– शंकर देशमुख