पुणे: विना हेल्मेट दुचाकी स्वार व पाठीमागे बसलेल्या प्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार पुणे करांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
याबाबत विविध विभाग लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, अशा सर्वांचे चर्चा करत हेल्मेट वापरा बाबत जनजागृती केल्यानंतर जानेवारी मध्ये कारवाईबाबतचा निर्णय घेणार असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नवनिर्माचित आमदार हेमंत रासने यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हेल्मेट सक्ती लागू करण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे.परंतु दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते.
स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहन चालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करण्यात यावा आणि तशी जनजागृती व्हावी असे अनेक विविध संघटनांचे म्हणणे होते.