पुणे: विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर महायुती सत्तेवर येईल असा विश्वास कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना होताच पण भूतो न भविष्यती असे यश महाराष्ट्रात भाजपला मिळाले आहे.
एकूण लढवलेल्या जागा 149 पैकी 133 होऊन अधिक जागांवर मोठा विजय मिळवला असून आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्वात पहिली सिंगल लार्जेस्ट पार्टी यांनी मिळवलेले यश आहे.
यात प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजाताई मुंडे आणि असंख्य नेत्यांनी या मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांना तर ‘आधुनिक अभिमन्यू’ अशी उपमा दिली आहे. यापुढील काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे एक प्रकारचा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे.