Spread the love
पुणे: पुण्यामधील शिवाजी रायगड स्मारक मंडळ व अग्रेसर भारत आयोजित प्रा.वसंत कानेटकर लिखित व गणेश ठाकूर दिग्दर्शित इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
खास कोथरूडकरांसाठी या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रयोगाचे प्रमुख  उद्घाटन  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे तर कार्यवाहक सुधीरराव थोरात उपस्थित राहणार आहेत. 
या नाटकाचा प्रयोग शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता म्हात्रे पुलाजवळील डीपी रोडवरील घरकुल लॉन्स या ठिकाणी होणार असून याच्या मोफत प्रवेशिका आयोजक विनीत गाडगीळ,आणि सुनील देवभानकर (9823276897)यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर या नाट्यप्रयोगांनंतर त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.