Spread the love

पुणे: कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. कोथरूड मतदार संघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील , महाविकास आघाडीकडून  चंद्रकांत मोकाटे तर मनसे कडून किशोर शिंदे हे रिंगणात असणार आहेत.

विद्यमान आमदार म्हणून असणारे चंद्रकांत पाटील याच्यावर कोथरूड मधील जनता नाराज असून गेल्या पाच वर्षांमध्ये
म्हणावा तसा विकास झाला नसून तेथील जनता मात्र चंद्रकांत पाटील यांच्या बाजूने नसल्याचे दिसून येत आहे.

चंद्रकांत पाटील यांचे पीए हे त्यांच्यापर्यंत समस्या पोहोचूनच देत नाहीत असा स्वर जनतेमधून पाहायला मिळत आहे. यंदा मात्र चंद्रकांत पाटील हे निवडून येतील अशी शक्यता दिसत  नाही . मनसेचे किशोर शिंदे आणि मशालीचे चंद्रकांत मोकाटे यांच्या बाजूने कोथरूड मधील जनता असल्याचे दिसत पाहिला मिळत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भेटीगाठीवर जरी जोर दिला असला तरीही जनता मात्र त्यांच्यावर नाराज असल्याचे खाजगी मध्ये बोलत आहे.

कोथरूडच्या अनेक सोसायटीमध्ये बकेट वाटप?

अनेक सोसायटीमध्ये कचरा बकेटेचे वाटप करण्यात आले आहे असे बोलले जात आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेचा अप्रत्यक्ष भंग असल्याचे तेथील जनता म्हणत असून एक प्रकारचे लालच दिले जात असल्याचे बोलले जात आहे.