पुणे: पुण्यातील विधानसभा क्षेत्रातील शिवाजीनगर ,कॅन्टोन्मेंट या ठिकाणी प्रचाराचा धडाका लावत काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साही आणि ऍक्टिव्ह झाले आहेत. २०१९ ची निवडणुकीपेक्षा यंदाची २०२४ निवडणूक चुरशीची होणार असे दिसत आहे. भाजपचे पारंपारिक मतदार म्हणत आहेत यंदा काँग्रेस मतदान करणार आहे.
कॅन्टॉलमेंट मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना निवडून आणणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कॅन्टॉलमेंट मतदार संघामध्ये अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित असून ते काँग्रेसच सोडवू शकते असे कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे विचार बोलताना दिसत आहे.
महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असा विश्वास दाखवला आहे.