पुणे: प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचे पारडे जड मानले जात आहे.कसब्यातील अनेक प्रभागांमध्ये स्थानिक लोकांशी आणि मतदारांशी चर्चा केल्यानंतर यंदा मात्र हेमंत रासने असा सूर पाहायला मिळत आहे.
कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते देखील मतभेद विसरून पुन्हा कसब्याची ओळख ही भाजपची ओळख दाखवून देणार असे म्हणत कार्यकर्ते एकवटले आहेत.
उद्यापासून प्रचाराच्या धडाका पाहायला मिळणार आहे. आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर कसबा मतदारसंघातील विकासकामे प्रश्न मार्गी लावणार असे जनता म्हणत आहे.