पुणे: विधानसभेचे बिगुल वाजलेले असताना पुण्यातून भाजपची लाट पुन्हा दिसत आहे. कोथरूड ,शिवाजीनगर, पर्वती आणि कसबा या चारही मतदारसंघातून पुन्हा भाजपचेच उमेदवार निवडून येतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. 2014 पासून ते 2024 पर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेला सामोरे जाण्यासाठी उमेदवार सज्ज झाले आहेत.अनेक इच्छुक उमेदवारांची उमेदवारी पुढे येत असली तरीही भाजप पक्ष म्हणून केलेली विकास कामेच पुढे नेणार असे पक्षांतर्गत बोलले जात आहेत.
दिंवगत गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्यानंतर कसब्यामध्ये भाजप हे बॅकफूटवर गेले असतानाच यंदा मात्र योग्य उमेदवार देऊन पुन्हा कसबा जिंकणार असा ठाम विश्वास भाजप मधील कार्यकर्ते करत आहेत. विधानसभा निवडणूक ही चुरशीची असली तरीहीपुन्हा भाजप सत्तेत येईल असा विश्वास खात्री ही कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जनतेशी संवाद साधत विकास कामांची माहिती घरोघरी पोहोचवत आहे. जनतेचा प्रतिसाद देखील भाजपला मिळताना दिसत आहे.
लाडकी बहीण योजना किंवा एसटी महामंडळाच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला वर्गांमध्ये देखील एक प्रकारचा भाजप कल वाढताना दिसत आहे.