Spread the love

मंगळवेढा: बळीराजा सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा यांच्या सहकार्याने जोगेश्वरी मंगल कार्यालयात आज सेवानिवृत्त कर्मचारी व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवत विशेषतः महिलांची संख्या मोठी होती.मेळाव्याला डॉ. प्रा. भीमाशंकर बिराजदार ,सोलापूर यांचे “सेवानिवृत्तीनंतरचे आनंदी जीवन” या विषयावर व्याख्यान झाले.

या कार्यक्रमात डॉ. संजय भोसलेंनी आपले विचार व्यक्त करत आपल्या अपेक्षा व महाराष्ट्राच्या योगदानाविषयी गौरव उद्गार काढले.

सहकार,प्रशासन आणि नागरिकांचे प्रश्न यावरील विचारांना नागरिकांनी उत्स्फुर्तपणे दाद दिली. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दामोदर देशमुख, व्हाईस चेअरमन अशोक वाकडे व सरव्यवस्थापक सूर्यकांत केदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या रीतीने आयोजन करण्यात आले.