मुंबई : उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा कारटं असा उल्लेख केला होता. या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लेकराशी काय भिडता, बापाशी भिडा. हिऱ्यापोटी गारगोटी नेहमी म्हणतो तेच उदाहरण असल्याचा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही. आम्ही कामामधूनच उत्तर देऊ. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याने ती बिथरले आहेत, म्हणून असं बोलत असल्याचा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी लगावला.