Spread the love

पुणे: पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सांप्रदायिक मंडळींसाठी श्रावण मासाच्या पवित्र शुभारंभालाच एक नवी पर्वणी सुरू होत असून ‘जागर हरिनामाचा!’ या चार दिवशीय कीर्तन महोत्सवाचे माजी नगरसेवक आणि आगामी होऊ घातलेल्या विधानसभा इच्छुक उमेदवार दिलीप वेडे पाटील यांच्या तर्फे दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनच्या वतीने ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२४ दरम्यान ‘दामिनी लॉन्स’ कोंढवे-धावडे येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

नुकत्याच पांडुरंग भेटीवरून पालख्या मूळ मुक्कामी स्थिरावले आहेत या अनोख्या पालखी सोहळ्यातही खडकवासला विधानसभा मतदारसंघातून पारंपारिक पिढ्यानपिढ्या ज्या दिंड्या साथ देत पंढरपूर कडे जातात त्या सर्व दिंड्यांचे वारकरीही या कीर्तन महोत्सवामध्ये उत्साहाने साहेब सहभागी होणार आहेत.

खडकवासला मतदारसंघात होत असलेल्या या कीर्तन महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत प्रामुख्याने खालील दिंड्या • गोहेकर संस्था रथामागे क्र.१९ • नांदेडकर दिंडी रथापुढे १५(भरजरी ध्वज), क्षत्रिय मराठा दिंडी रथामागे क्र. ९७ • जशेश्वर पंचक्रोशी दिंडी रथामागे क्र.४७ • मुळशी तालुका दिंडी रथामागे क्र. ९६ • मुठा खोरे वारकरी समिती • मुक्ताबाई बेलगावकर रथामागे क्र.५९ • बोराटे माऊली दिंडी क्र. ७७, संतकृपा प्रासादिक दिंडी क्र. २०१ रथामागे • बाळाराम महाराज कांबेकर दिंडी • वेल्हा तालुका दिंडी रथामागे क्र.८८ • भोर तालुका दिंडी रथापुढे क्र. १७ • हरिबाबा दिंडी, शिवगंगा खोरे सर्व दिंडी कीर्तन साथ संगत देणार असल्याने या कीर्तन महोत्सवाला एक वेगळ्या प्रकारची उंची निर्माण होणारं असून खडकवासला विधानसभेत हरिनामाचा भव्य जागर घुमणार असून संपूर्ण खडकवासला मतदारसंघांमध्ये दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनच्या ‘भव्य कीर्तन महोत्सव’ ची चर्चा सुरू झाली असून दिग्गज किर्तनकारांची मांदियाळी येणार असल्याने या मोठ्या कीर्तनकारांना ऐकण्यासाठी गावागावातून संप्रदायिक मंडळी एकत्र येण्यास सुरुवात झाली असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे ( संत तुकाराम महाराज), ह.भ.प. त्रिगुण महाराज गोसावी (संत सोपानकाका), ह.भ.प.बाळासाहेब रणदिवे (चोपदार), ह.भ.प. मुक्ताबाई महाराज बेलगावकर, ह.भ.प. राजाभाऊ रणदिवे (चोपदार) यांच्या प्रमुख उपस्थितीत ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे (कीर्तनकेसरी), जगद्‌गुरु कृपांकित डॉ. पंकज महाराज गावडे, ह.भ.प. संदिप महाराज गोगावले, यांच्या विशेष सहकार्याने सदरील कीर्तन महोत्सव पार पडणार आहे. किर्तन महोत्सवाचा शुभारंभ दि.०६/०८/२०२४ रोजी सायं. ६ ते ८ ह.भ.प. रामायणाचार्य श्री. रामरावजी महाराज ढोक नागपुर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने होणार आहे.

 

तर बुधवार दि.०७/०८/२०२४ रोजी सायं. ६ ते ८ ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर जळगाव व दि.०८/०८/२०२४ रोजी सायं. ६ ते ८ ह.भ.प.नरेंद्र महाराज गुरव मालेगाव यांची कीर्तने होणार आहेत. तर समारोपाला दि.०९/०८/२०२४ रोजी सायं. ६ ते ८ वाजता काल्याचे कीर्तन ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे मांडवी यांचे होणार आहे. तर संपूर्ण किर्तन महोत्सवासाठी महिला भजनी मंडळ भजनसेवा यांची असून दररोज दुपारी ३ ते ५ च्या दरम्यान हरिपाठ ही माऊली ज्ञानसंस्कार गुरुकुल, मांडवी दररोज सायं. ५ ते ६ केला जाणार आहे.

 

दररोज सुश्राव्य कीर्तनानंतर महाप्रसादाचीही सोय करण्यात आल्याचे आयोजक दिलीप वेडेपाटील यांनी जाहीर केले आहे.