Spread the love

पुणे: देशाला दरवर्षी सुमारे 30 लाख युनिट्स इतकी रक्ताची कमतरता भासते याच कारणामुळे रक्तदान हा आपल्या कर्तव्याचा भाग ठरतो.

देशाप्रतीची जाणीव ठेवून परम पूज्य सरसंघचालक राजेंद्रसिंहजी तथा रज्जू भैय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त कौशिक आश्रम व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंहगड भाग यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी व यातील सहभाग अधिक व्यापक करण्यासाठी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

हे रक्तदान शिबिर 4 ऑगस्ट रोजी असून सकाळी१० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.अधिक स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदवून आपले कर्तव्य पार पाडावे.