पुणे : सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कोरवी फाउंडेशन चा सहावा वर्धापन दिन सहकारनगर मधील ढुमे क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाला. कोरवी फाउंडेशन हे महिलांसाठी दरवर्षी विविध उपक्रम राबवते यात प्रामुख्याने महिलांना हस्तकलेचे प्रशिक्षण देणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्यासाठी विविध वस्तू बनवणे, व त्या बनवलेल्या वस्तूंचा विक्री पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे, तसेच जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण असलेल्या पर्यावरणासाठी पर्यावरण पूरक हस्तकलेच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देणे. महिलांना आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर बनवणे, जगण्याचे धारिष्ट देणे. महत्त्वपूर्ण उपक्रम दरवर्षी राबवत असते. आज याच संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या सुभाष जगताप व सौ सोनल थोपटे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोरवी फाउंडेशनच्या संचालिका चिन्मयी सुकथनकार यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले. यात ही संस्था विविध शुभचिंतकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तसेच त्यांच्या आर्थिक मदतीने भरारी घेत आहे. यात ही संस्था विविध शुभचिंतकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तसेच त्यांच्या आर्थिक मदतीने भरारी घेत आहे.
शुभचिंतक प्रोपिक्स टेक्नॉलॉजि, स्नेहांकुर, एकता मित्र मंडळ ट्रस्ट, विक्रम सुकथनकर,पोशाख च्या कविता अवस्थी, दुर्गा महिला नागरी सहकारी पाठ संस्था, सुयोग मराठे, पूर्वा अरणकल्ले, निरंजन भाटे, शशिकला दंडवते, सुजाता खैरनार, अनुष्का जोशी, व सचिन पालके या सर्वांनी संस्थेच्या यशात सिंहाचा वाटा उचलला आहे अशा सर्व हितचिंतकांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
समाजसेवा करत असताना अनेक स्वयंसेवकाची मोलाची साथ सुध्दा तितक्याच महत्वाची असते. यामुळं आम्हाला ती साथ लाभली आहे़. यामध्ये दिप्ती व्यास, दीपाली टिळेकर, जय अंब्रे, अरुणा सुकथनकर, राजश्री भालेराव, उल्का साठे, नीलिमा भोपटकर या स्वयंसेवकांनी संस्थेच्या यशात मोलाची कामगिरी केली आहे. अशा सर्व हितचिंतकांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते समीर जोशी यांनी केले.