Spread the love
पुणे : किरकोळ वादाचे रूपांतर वादात झाले भांडणात झाले असून पुण्यांतील वडगावशेरी येथे प्रकार घडला. चंदननगर पोलीस ठाणे येथील गु. र. क्र ५९१/२३, हा गुन्हा भा. द.वी कलम ३०७ प्रमाणे नोंदविण्यात आला आहे .  मोक्याची कारवाई करण्यात आल्यामुळे सदर खटल्याचे कामकाज हे विशेष मोका न्यायाधीश श्री. व्ही.आर.कचरे साहेब यांच्या कोर्टात चालवण्यात आले आहे.  सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचे म्हणणे की मित्राचे भांडण सोडवायला गेले असता आनंद पार्क वडगाव शेरी या परिसरात त्यांच्यावर कोयत्याने मारहाण व दगडफेक करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने आरोपींना अटक करण्यात आली होती.
सदर घटनेची व्हिडिओ क्लिप ही वायरल झाली होती. सदर खटल्यात आरोपी अक्षय ताकपरे याने जामीन अर्ज ठेवून त्याचा गुन्ह्याशी संबंध नसून व मोका कायद्यातील तरतुदी त्याला लागू होत नसल्याचे आणि शैक्षणिक नुकसान होत असल्याचे युक्तिवाद करण्यात आला होता, त्याच्या  विरोध करत सरकार पक्षाने सदर गुन्ह्याची व्हिडिओ फुटेज असून, सह आरोपी कडून कोयता जप्त करण्यात आल आहे, गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद करत जामीन अर्जास आक्षेप नोंदविला होता.
विशेष मोका न्यायाधीश श्री. व्ही.आर. कचरे साहेब यांनी आरोपी अक्षय ताकपेरे याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आणि त्याच्यावर लावलेले आरोप हे कलम ३०७ याच्या कक्षेत बसणारे नसून त्याच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन अर्ज मंजूर केला. आरोपी अमोल चोरगडे, राहुल बरवसा आणि हरिकेश चवान यांनी जामीन अर्ज सादर केले असता त्यांचा देखील वरील आरोपी सारखाच रोल असल्याकारणाने त्यांना ही जामीन देण्यात आला.
वरील सर्व आरोपींच्या वतीने युक्तिवाद अ‍ॅड सुशांत तायडे यांनी केला तसेच प्रज्ञा कांबळे- तायडे, दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकुळे  यांनी कामकाज पाहिले.

आरोपीचे वडील हयात नसून त्याचे मामा त्याचा सांभाळ करीत त्याचे शिक्षणाचे बघत होते आणि त्याला तो शिक्षण घेत असलेले ठिकाणी डिप्लोमा इन टूल इंजिनिअरिंग मध्ये ९०% हजेरी अट होती, अश्या आरोपींवर मोक्या सारखी कडक कार्यवाही करण्याआधी शासनाने विचार करायला हवा, फ्कत गुन्हेगारी वर आवर घालणं गरजेचे नाही, त्यामुळे योग्य आणि सुशिक्षित मुलांचे नुकसान तर होत नाही या कडे ही लक्ष द्यायला हवे.

   – वकील सुशांत तायडे