Spread the love

मुंबई: लोकसभेची ही निवडणुक सत्य आणि असत्य, ईमानदारी आणि बेईमानी, प्रेम आणि व्देष यांची असून चीनी सामानाप्रमाणेच आता मोदींची गॅरेंटी संपली आहे. मोदींना आता महाराष्ट्रातील पराभव दिसत असल्यानेच पंतप्रधान मोदी तीन दिवसात दोन वेळा राज्यात येत आहे. संविधान संपविण्याची भाषा करणा-या लोकांनाच आता संपवायची वेळ आली आहे. असे वक्तव्य मुंबई कॉग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी केले. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ गोवंडी शिवाजीनगर या ठिकाणी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

गेल्या दहा वर्षात भाजपने केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड मागितले जात आहे. मात्र ते देण्याऐवजी दिशाभुल करण्याचे काम केले जात आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढली असून त्यावर मोदी काही बोलायला तयार नाही. पण मटन, मासे आणि मंगलसुत्रावर ते बोलत आहे. अब की बार चारशो पारचा नारा देणा-या भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे म्हणुन त्यांना चारशे पार हवे आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथील लोकांचा अपमान करणा-याना कधीच माफ केले जाणार नाही. घाटकोपर येथे मोदींचा रोड शो झाला राजावाडी रुग्णालयाजवळून ते गेले मात्र घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेतील जखमींना ते पाहायला गेले नाही. अस वक्तव्य चरणसिंग सप्रा यांनी केले.

 

मुंबईत सर्व जागांवर भाजपचा पराभव दिसत असून मोदींना आता महिलाच उत्तर देतील. ही भूमी जीजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांची असून मोदींना याच भूमिवर त्यांची जागा दाखवुन देऊ असे वक्तव्य आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन यांनी केले. तर माजी मत्री अनीस अहमद यांनी सांगितले की राज्यात आता मोदी विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात लोट्स ऑपरेशनच्या माध्यमातून शिवसेनेतील काही आमदारांना खोके देऊन सरकार पाडण्याचे काम केले. कॉग्रेसने गरीब जनतेसाठी आणलेल्या चांगल्या योजना भाजप सरकारने बंद केल्या. देशात महागाई, बेरोजगारी वाढली असून आम्हाला आमचे जुनेच दिवस परत द्या. आम्हाला तुमचे चांगले दिवस नको आहेत. त्यासाठी संजय दिना पाटील यांना भरघोष मतांनी निवडून द्यावे, असेही शेवटी अनिस अहमद म्हणाले.