Spread the love
  • मुंबई: ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना मुंबई साऊथ इंडियन सेलच्यावतिने पाठिंबा देण्यात आला. भांडुप येथील शेरा हॉटेल मध्ये झालेल्या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा उपस्थित होते. 

हॉटेल शेरा या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात अनेक व्यावसायिक तसेच मुंबई साऊथ इंडियन सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सांगितले की मी देखील एक व्यावसायिक आहे. मात्र समाजसेवा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन मी व्यापा-याकडे दुलर्क्ष केले.

 

यावेळी माझ्या सर्व कुटुंबाने आपले आयुष्य समाजसेवा करण्यात घालविले. आपण सर्वजण मला मदत कराल अशी अपेक्षा करतो आणि चार जुन रोजी जल्लोष करण्यासाठी सर्वजण परत एकदा भेटू अशी माहिती संजय दिना पाटील यांनी शेवटी दिली.