Spread the love
पुणे :आधी मोक्का डिस्चार्ज, नंतर सत्र खटल्यात जामीन मंजूर झाला आहे .आरोपी  सुरज पंडित यावर ३०२ व इतर १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्या कारणाने त्याच्या टोळीवर मोक्का गुन्ह्या अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती, परंतु विशेष मोक्का न्यायाधीश श्री. व्ही. आर. कचरे साहेब यांच्यासमोर सदर आरोपी यावर व त्याचे सह आरोपी यांच्यावर गंभीर गुन्हे असले तरी मोक्का कायद्यातील तरतुदीनुसार सदर खटला हा मोक्का अंतर्गत चालू शकत नाही. 
अन्य बाबी मांडण्यात येऊन मोक्का कलम कमी करण्यात आले आणि तदनंतर सदर प्रकरण हे सत्र खटला म्हणून मे. एस. एस गुल्हाणे साहेब यांच्यासमोर दाखल करण्यात आले.
आरोपी सुरज पंडित, यश जावळे, समीर बागवान यांची एकाच दिवशी सशर्त जामीनावर सुटका करण्यात आली.
त्यांच्यावर तलवारी चा धाक दाखवून सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम पहाटे ४ च्या सुमारास काढून घेतल्याचे व परिसरात दहशत पसरविण्याचे आरोप होते. वरील आरोपींचे मोक्का व सत्र खटल्यातील कामकाज ॲड. सुशांत तायडे आणि त्यांचे सहकारी प्रज्ञा कांबळे(तायडे), दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकुळे यांनी पाहिले. 
मोक्का कार्यवाही केल्यामुळे दोन ते तीन महिन्यात येणारे दोषारोप पत्र हे सहा महिन्यानंतर दाखल करण्यात येते आणि मोक्का कलम लागू होत नसेल तर आरोपींना विनाकारण तुरुंगवास जास्त महिने सोसावा लागतो. सदर बाबीकडे कोर्ट व शासनाने योग्य लक्ष देणे गरजेचे आहे.
              – ॲड. सुशांत तायडे