Spread the love

पुणे: शिरूर लोकसभा मतदार संघातून तळेगाव ढमढेरे येथील असणारे  अँड स्वप्निल शेलार यांचा अर्ज वैध ठरला आहे. सर्वात तरुण उमेदवार( वय 26 )शेलार यांनी अपक्ष म्हणून शिरूर लोकसभेसाठी फॉर्म भरला आहे. शिरूर लोकसभा मध्ये विकास कामाची गती नसून आजी-माजी खासदारांनी विकासात्मक कोणतीही कामे केली नाहीत त्यामुळे अँड स्वप्निल शेलार सर्वात तरुण उमेदवार म्हणून लोकसभा लढवत आहे.

 

यावेळी ते  माध्यमाशी  संवाद  साधताना म्हणाले ,तरुणांचे प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने समजतात, तसेच शेतकरी असल्यामुळे मला शेतकऱ्यांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे याची जाणीव आहे. तसेच सामाजिक बांधिलकी, देश प्रश्नाचे अभ्यास, कायद्याची पकड, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी ॲड स्वप्निल शेलार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकांना आवाहन केले आहे,  तुमच्या घरचा सर्वात तरुण उमेदवार म्हणून मला लोकसभा निवडणुकीला उभा राहत आहे . मला विश्वास आहे की जनता माझ्या पाठीशी उभा राहील आणि संसदेत पाठवेल .शिरूर लोकसभेतील जनतेला आश्वासन देतो शिरूर लोकसभेची प्रलंबित प्रश्न मार्गी लावेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

सामाजिक बांधिलकी जपत अँड स्वप्नील शेलार यांनी आपल्याबरोबर दहा लोकांना लोकसभेचे फॉर्म भरून दिले आहेत. जनता नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहते आणि मी तरुण असल्यामुळे सर्वसामान्य घरातून आल्यामुळे लोकांचे प्रश्न मला खूप जवळून अनुभवले आहेत  आणि अनुभवतो आहे , त्यामुळे जनता माझ्यावर मतपेटीतून प्रेम व्यक्त करेल असा विश्वास यावेळी  व्यक्त केला आहे .     

       

               

 शिरूर लोकसभा मतदारसंघातील कांद्याचे प्रश्न, तसेच रस्त्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न आजी-माजी  खासदारांनी सोडवले नाहीत, उलट त्याचा आभास निर्माण केला आहे. तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात उदासीनता आहे. मी तरुण उमेदवार म्हणून तरुणांचे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने समजतात आणि कळतात. शिरूर मतदार संघातील जनतेला आश्वासन देतो की मतदार संघातील सर्व प्रश्न मार्गी लावीन.

     अँड.स्वप्निल शेलार
    अपक्ष उमेदवार, शिरूर लोकसभा मतदारसंघ