पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे मंत्री व भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे ऑफिसला भेट दिली आहे . याप्रसंगी पुणे लोकसभेसह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील प्रचार व परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. उमेदीच्या दहा वर्षांच्या काळात पक्षासाठी केलेल्या कामाविषयी चंद्रकांत दादा यांना माहिती दिली. दुःख, माझ्या वेदना त्यांना सांगितल्या. त्यावर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत माझं म्हणणं पोहचवेन असा विश्वास मला दिला.
२०१४ मध्ये संजय काकडे यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले होते . त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभेतील भाजपाचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या विजयासाठी संजय काकडे यांनी काम केले.
देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब व नितीन गडकरी साहेब यांच्या सांगण्यावरून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. आणि पुढील सहा वर्षांच्या कार्यकाळात सदैव मोदी सरकारसोबत राहिलो आहे . त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील सर्व विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार निवडून येण्यासाठी कश्या योजना आणि काम केले प्रयत्न केले याविषयी चंद्रकांत दादांना माहिती दिली.
भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी मोहिमेत एकट्याने दीड लाख सदस्य नोंदणी केवळ पुणे लोकसभा मतदार संघात केली. नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीच्या समर्थनार्थ देशातील पहिली रॅली पुणे शहरात संजय काकडे यांनी काढली. यामध्ये सुमारे ८० हजार पुणेकर नागरिक सहभागी झाले होते.
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पुणे महापालिकेत शरद पवार यांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी मी काय-काय केले याची सविस्तर माहिती चंद्रकांत पाटील दिली.
त्यानंतरच्या २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट व विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे, स्वतः चंद्रकांत पाटील सुनील कांबळे यांच्या विजयासाठी जी मेहनत घेतली होती .
पक्षासाठी दहा वर्षांत पक्षाने, वरिष्ठ नेत्यांनी दिलेले प्रत्येक काम ही माझी जबाबदारी होती. ते पूर्ण करणं हे माझं कर्तव्य होतं ,संजय काकडे यांनी केलेली सर्व कामे ही सर्वांसमोर आहेत.
आता माझं दुःख काय आहे? माझ्या वेदना काय आहेत? याचीदेखील सविस्तर माहिती दिली आहे .;चंद्रकांत दादांनी या सर्व बाबी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत नक्की पोहोचवणार असा विश्वास मला दिला आहे.