आपल्या आईचा आपल्या आयुष्यावर प्रचंड मोठा प्रभाव असतो. पण जगण्याच्या धावपळीत आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं राहून जातं. घरात सर्वांचे कौतुकाचे सोहळे होतात. मात्र आईचा कौतुक सोहळा होत नाही. खरं तर आईला कसलीही अपेक्षा नसते. मात्र, मोठ्या झालेल्या आपल्या लेकरानं आपल्या कौतुकाचा सोहळा आयोजित करावा, त्यात सहभागी व्हावं, आपल्या बोटाला धरून भव्य कार्यक्रमाला घेऊन जावं या कल्पनेनेच आईच्या डोळ्यात आनंदाचे आणि कृतार्थतेचे अश्रू ओघळतात, अशी असते आपली आई. मात्र, असा योग कोण आणि कसा आणणार? व्यस्त दिनक्रमात एवढा भव्य समारंभ कसा आयोजित करणार? त्यासाठीच तर वल्लरी मीडियाने ‘आई महोत्सव’ ही संकल्पना समोर आणली आहे.
🤔 काय असेल आई महोत्सवात?
आई महोत्सव हा आपल्या आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा पुणे शहरामध्ये आयोजित एक भव्य सोहळा असेल. यामध्ये राज्यभरातील एकूण २५ आईंचा सेलिब्रिटिंच्या हस्ते सन्मान करण्यात येईल. ‘आईची माया’ या पुस्तकात प्रत्येक आई-मुलगा/मुलगी यांचं नातं उलगडणारा लेख असेल. आई विषयावरील विशेष सांस्कृतिक (गीत-नृत्य) कार्यक्रम, आई विषयावर मान्यवर सेलिब्रिटीचे व्याख्यान, आईचा सन्मान (शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ), मुलगा/मुलीला सन्मानपत्र (सन्मानपत्राचे वाचन), माध्यम प्रसिद्धी आणि कार्यक्रमानंतर स्नेहभोजन असा भव्य तीन तासांचा सोहळा असेल.
🙋🏻 कोण सहभागी होऊ शकतं?
आपल्या आईवर अपार प्रेम करणारे महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात असलेले, नोकरी-व्यवसाय करणारे कोणीही इच्छुक ‘आई महोत्सवात’ सहभागी होऊ शकतात. केवळ आई महोत्सवात सहभागी झालेल्या मंडळींनी समारंभाला उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
🎁 सहभागींना काय मिळेल?
▪️ आई महोत्सवाचा भव्य कार्यक्रम
▪️ ‘आईची माया’ या कॉफी टेबल बुक स्वरुपातील पुस्तकात आई-मुलाच्या नात्याची गोष्ट.
▪️ ‘आईची माया’ या पुस्तकाच्या दहा भेट प्रती.
▪️ मान्यवर सेलिब्रिटिंच्या हस्ते आईचा सन्मान (शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह)
▪️ मुलगा मुलगीला सन्मानपत्र, सन्मानपत्राचे वाचन
▪️ आई महोत्सवात आपल्या दहा आप्तेष्ट, स्नेही, मित्रमंडळींना देण्यासाठी स्वतंत्र निमंत्रणपत्रिका (डिजीटल + १० प्रती प्रिंट) निमंत्रण
▪️ स्नेहभोजन
▪️ माध्यमांमध्ये प्रसिद्धी
वल्लरी मीडिया, पुणे