Spread the love
मुंबई :महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, ब्रॅंडिंग व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला. रायपूर, छत्तीसगड येथे महापारेषण  जनसंपर्क अधिकारी डॉ.मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर या पुरस्कार मिळाल्याबद्दल जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले. भारतीय जनसंपर्क परिषदेच्या छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी `पीआरएसआय`चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सचिव डॉ. पीएलके मूर्ती, डॉ. यू. एस. शर्मा, डॉ. समीर गोस्वामी, रायपूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. शाहीद अली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.